भुसावळ – मुंबईहून नागपूर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशाच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त करण्यात आला. 6 रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ स्थानकावरील आऊटरवर डाऊन खांबा क्रमांक 443/9/10 ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाने केली. या प्रकरणी आरपीएफ एएसआय प्रल्हाद अमरनाथ सिंग आरोपी मो.अहमद फुकरान अन्सारी (21, बाबासाहेब आंबेडकर नगर, घर नं.187, कुलाबा, मुंबई) विरुद्ध भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला 7 रोजी न्यायालयात हजर केले त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपी गोरखपूर एक्स्प्रेसने नागपूर जाण्यासाठी निघाला मात्र तो आऊटरवर उतल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेणयात आल्यानंतर त्याच्याकडे चाकू आढळला. तपास हवालदार पोलिस निरीक्षक सुरज सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजीत तडवी करीत आहेत.