भुसावळात महिलेचा विनयभंग : आरोपीला जामीन

0

भुसावळ | प्रतिनिधी 

शहरातील जळगाव रोडवरील ताडीच्या मळ्या जवळ एक स्कुटीवर जात असलेल्या महिलेस मुका घेण्याचा आवाज तोंडाने विकास चाळे या युवकाने काढल्याने महिलेने याचा जाब विचारला असता, महिलेला शिवीगाळ करीत महिलेवर हात उचलला होता. या प्रकरणी चाळे यास अटक करण्यात आली होती. त्यास रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दररोज पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. संशयीत चाळे विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.