Saturday, January 28, 2023

भुसावळात महामार्गावर मुख्य जलवाहिनी फुटली ; ४० हजार लोकसंख्येच्या भागाचा पुरवठा ठप्प

- Advertisement -

भुसावळ (प्रतिनीधी)-  शहरातील नाहाटा चौफुली जलकुंभातून खडकारोड जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी मेन रायझींग रविवारी दुपारी तब्बल दोन ठिकाणी फुटल्याने खडका रोड, गडकरी नगर व परीसरातील किमान ४० हजार लोकसंख्येला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. किमान दोन दिवस या भागातील नागरीकांना टंचाई सहन करावी लागणार आहे.

भुसावळ शहराच्या पाणीपुरवठा विभागाच्या नाहाटा चौफुली जलकुंभावरून खडका रोड टाकीला जोडणारी मेन रायझिंग तब्बल दोन ठिकाणी फुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहरात आधीच आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, त्यातही वारंवार पाईपलाइन फुटत असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील खोदकामामुळे वारंवार मेन रायझींग फुटून खडकारोड, गडकरी नगर आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. सोमवारी देखील मेन रायझींग तब्बल दोन ठिकाणी फुटली. दरम्यान पालिका प्रशासनाने रविवार पासूनच पाईपलाईन जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. किमान दोन दिवस दुरुस्ती व चाचणी झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. दरम्यान शहरातील जिर्ण पाईपलाइनचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून अमृत योजना तातडीने पूर्ण न झाल्यास शहरातील पाणीप्रश्न अंत्यंत गंभीर होण्याची भिती आहे

महामार्गावरील दोन्ही ठिकाणीची पाईपलाईन जोडल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. या कामामुळे नाहाटा टाकी वरून होणारा व खडका रोड, गडकरी नगरसह परीसरातील सुमारे ४० हजार लोकसंख्येला मिळणारा पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने अर्थात मंगळवारी होणार आहे, असेही पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नितीन लुंगे यांनी सांगितले.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे