भुसावळ | प्रतिनिधी
येथे भीम आर्मीच्यावतीने उत्तप्रदेशतील हाथसर येथील घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथसर येथे दलित युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात देशभरात तीव्र निषेध केला जात आहे . येथील भीम आर्मीच्यावतीने कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी योगी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच पीडित तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देवून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी घ्यावी भीम सैनिकांच्यावतीने करण्यात आली.