भुसावळात भाजप बुथ प्रमुखांचा मेळावा

0

भुसावळ :-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपच्या बुथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला.
भुसावळ शहरातील बुथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, नगरसेवक, भाजपा शाखा अध्यक्ष व कार्यकर्ते, पदाधिकारी यांची वरील सर्व पदाधिकार्यांची बैठक आमदार कार्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेली होती.

याप्रसंगी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ. सुनील नेवे सर, नगराध्यक्ष रमण भोळे, शहरअध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भुसावळ विधानसभा विस्तारक दिनेश नेमाडे, गटनेते मुन्ना तेली, बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.