भुसावळात भव्य दिव्य भुलाबाई महोत्सवाचे आयोजन

0

भुसावळ प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे यंदाही सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था, भुसावळ तर्फे भुलाबाई महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे, यात रांगोळी स्पर्धा, पुजेची थाळी सजवणे स्पर्धा, नाश्ता प्लेट तयार करणे स्पर्धा व पारंपारिक भुलाबाई ची समूह गीते व नृत्य तसेच टिपरी नृत्य आदी चा समावेश आहे.
समूह वा संघा मध्ये, कमीत कमी 5 व जास्तीत जास्त 15 यांचा सहभाग असून विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहे.
स्पर्धा तीन गटात होणार असून पहिला गट- 4ते 9 वर्ष वयोगट दूसरा गट – 10 ते 18 वर्ष वयोगट तिसरा गट खुला आहे. या विविध स्पर्धेत आपण आपल्या संस्था, महिला मंडळ, बचत गट, तसेच शाळेचे वा विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थीनीसह सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत लकी ड्रॉ काढण्यात येणार असून पैठणीसह आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहे. खान्देशी खाद्य पदार्थांसह विविध वस्तुंचे स्टॉल्स कार्यक्रम स्थळी लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाची वेळ व ठिकाण
13 वार:- रविवार सकाळी:- 8;30 ते 5:00 ठिकाण :- सेंट मेरी स्कुल ( 5 नं. शाळा) आठवडे बाजार भुसावळ सहभागा करिता नाव नोंदणी आवश्यक आहे .स्पर्धेत सहभागी होण्यास नाव नोंदणी करिता व अधिक माहिती करिता राजश्री नेवे,( 9561304087 ), उज्वला बागुल (9422278732 ) सौ प्रतिभा विसपुते (9637097646 ) यांचे कडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.