भुसावळात प्लास्टीक विक्रेत्यावर कारवाई; ५ हजाराचा दंड

0

भुसावळ : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लास्टीक विक्रीवर २३ जूनपासून बंदी आणली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत आज २६ रोजी भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी नियुक्त केलेल्या पथकाने यावल रोडवरील एका दुकानाची तपासणी केली असता त्या दुकानात प्लास्टीक साहित्य मिळून आल्याने विव्रेâत्याला ५ हजार रुपयाचा दंड ठोठावून प्लास्टीक साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे व्यापाNयांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात ही दुसरी कारवाई आहे. सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टीक विक्रीवर बंदीची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी २६ रोजी शहरातील यावल रोडवरील न्यु शंकर प्रोव्हीजन अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाची तपासणी केली असता दुकानामधून प्लास्टीक कॅरीबॅगसह अन्य साहित्य जप्त केले. दुकानाचे मालक अमितकुमार यांच्याकडून ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे व्यापारी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी निवृत्ती पाटील, सूरज नारखेडे, राजेंद्र चौधरी, भागवत चौधरी, शाम बाणाईत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.