भुसावळ (प्रतिनिधी )
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० वी जयंती येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये साजरी करण्यात आली . यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या हस्ते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करून आदरांजली वाहिली .
यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोहेकॉ. नंदकिशोर सोनवणे,पोना संदीप परदेशी,पोकॉ.सचिन पोळ,मंदार महाजन,संजय भदाणे,सुभाष साबळे, बालक बा-हे तसेच पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.