Thursday, September 29, 2022

भुसावळात पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न

- Advertisement -

भुसावळ | प्रतिनिधी  

- Advertisement -

शहरातील जळगाव रोडवरील अमरोलीवाला यांच्या  पेट्रोल पंपावर शनिवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
स्विफ्ट डीझायर कारमधून आलेल्या सहा युवकांनी बाटलीत  पेट्रोल  मागितले तेव्हा पंपावरील मुलाने  देण्यास नकार दिला व  त्याच्या जवळील पैसे हिसकाविण्याचा प्रयत्न केला.  जळगाव रोडवरील दावलभक्त हॉस्पीटलसमोरील पेट्रोल पंपावर शनिवारी दुपारी 4.30 ते 5 वाजेच्या सुमारास स्विफ्ट डीझायर कार (एम.एच.04 ई.क्यु. 2314) आली. कारमध्ये सहा जण होते, त्यांनी बाटलीत पेट्रोलची मागणी केली, त्यावेळी पंपावरील कर्मचार्‍यांने बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्याने. गाडीतील युवक खाली उतरला त्यांने स्वत: पंपावरील पाईप हातात घेत पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचार्‍यांनी त्यास विरोध केला असता, त्यांनी कर्मचार्‍यांच्या गळ्यातील पैसे ठेवण्याच्या बॅगेतील पैसे लांबविण्याचा प्रयत्न केला. पैसे हिसकाविण्याचा प्रयत्न फसल्याने ते युवक गाडीत बसून पसार झाले. याप्रकरणी येथील शहर पोलिस ठाण्यात दिलीप प्रल्हाद चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी पंपावर भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत मोहंमद अली सय्यद, संजय पाटील, अनिल चौधरी उपस्थित होते. पंपावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. फुटेजच्या आधारे संशयीत लवकरच जाळयात येतील असे निरीक्षक ठोंबे यांनी सांगितले.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या