भुसावळात पुन्हा चाकू हल्ला

0

भुसावळ :- शहरात पुन्हा एकदा चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील आयन कॉलनीतील रहिवासी आशिक बेग असलम बेग यांच्यावर तीन जणांनी चाकूने वार करून पलायन केले. हि घटना रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान हल्लेखोर तीन पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

आशिक बेग असलम बेग याचा त्याच्यावरील खटल्यात जमीन झाल्यानंतर तो आपल्या आयान कॉलनीतील घरी जात असतांना रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तीन ते चार जणांनी जुन्या वादावरून चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.