भुसावळात पावसाचा तडाखा ; राहूल नगरातील अनेक कुटुंब उघड्यावर

0

भुसावळ | प्रतिनिधी
शहरातील राहुल नगरात असलेल्या झोपडपट्टीवासीयांना पहिल्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून अनेक कुटुंबं पावसामुळे उघड्यावर आली आहे.
भुसावळ मधील राहुल नगरात गुरुवार रोजी मध्यरात्री आलेल्या पावसामुळे काही झोपड्या जागीच कोलमडल्या असून सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मात्र येथील अनेक संसार उघड्यावर आले आहे. अनेकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले असून लहान मुलांसह आता कुठे जावे हा प्रश्न येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. हा परिसर नदी काठाजवळ असल्याने अनेक ठिकाणी मातीही धसून भेगा पडल्या आहे. त्यामुळे भविष्यात येथे मोठी दुर्घटना होवू शकते. मात्र प्रशासन या झोपपट्टीवासीयांकडे दुर्लक्ष करत असुन प्रशासनाचा एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नसुन अद्याप ही येथील नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.