भुसावळ (प्रतिनिधी)– शहरात धूम स्टाइलने मंगलसूत्र चोरिच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून येथील जळगाव रस्त्यावरील गांधी पुतळा जवळील दुसऱ्या पेट्रोल पंपा जवळ तहसील कार्यालयासमोर अज्ञात दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र
धूम स्टाईलने लांबवल्याची घटना दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.याघटनेमुळे शहरातील महिलांमध्ये भीतिचे वातावरण पसरले आहे .
निंभोरा ता.रावेर येथील सुरेखा प्रभाकर कोळंबे(वय ४८) ह्या त्यांच्या मैत्रिण लीना नेमाडे यांच्या मुलीचे लग्नासाठी जळगाव येथे कारने गेल्या होत्या . लग्न आटोपून त्या व त्यांचे पती प्रभाकर कोळंबे, गुरु बहीण सपना नरेंद्र राणे,वहिणी आरती किशोर नेहेते हे निंभोरा येथे जात असतांना रस्त्याने भुसावळ येथे तहसील कार्यालयासमोर रस्तावर थाबले. यावेळी सुरेखा कोळंबे व सोबतच्या महिला रस्ता ओलांडून हातगाडीवर स्ट्रॉबेरी घेण्यासाठी जात असताना अचानक समोरून विना नंबरच्या पल्सर गाडीवर दोन युवक आले त्यातील हेल्मेट घालून मागे बसलेल्या तरुणाने त्याच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र बळजबरीने तोडून लांबवले . पल्सर चालविणार्या व्यक्तीने हेल्मेट घातलेले नव्हते.
त्यांच्या अंगात काळया रंगाचे जर्किन घातले होते. यावेळी महिलांनी जवळच वाहने पकडून उभ्या असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना मदतीसाठी आरडाओरड करून विनंती केली. मात्र त्यांनी मदत न केल्याचा आरोप ही या महिलांनी केला आहे . मंगळसूत्र लांबवून चोर पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.बी.ठोंबे व सहकाऱ्यांनी पेट्रोल पंपासह काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून चोरटयांचा शोध घेत आहेत . या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३९२ प्रमाणे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.