भुसावळात दारोडयाचा प्रयत्न फसला ; राष्ट्रीय महामार्गावर चार दरोडेखोरांना पोलिसांनी केले जेरबंद

0

भुसावळ (प्रतिनिधि)- शहरात सध्या तरुण गुन्हेगारांनी डोके वर काढले असून शहरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसे- दिवस वाढत आहे.यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी  मध्यरात्रीची गस्त वाढवीली असून  गुन्हेगारांचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली आहे . या पार्श्वभूमिवर  काम करीत असतांना  सोमवार दिनांक २६/६/२०२१ रोजी रात्री  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अंधाराचा फायदा घेत  दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले व दडून बसलेले चार आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले .   असून या 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की,फिर्यादी पो कॉ.विनोद नारायण डोळे बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २६/६/२०२१ रोजी रात्री ३.३० ते ४.५० वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रोडवर नाहाटा चौफुली उड्डाण पुलाजवळ वरणगाव रोडवर घातक शस्त्र ताब्यात बाळगून आधाऱ्यांचा फायदा घेऊन दरोडा घालण्याच्या उद्देशाने रोडवर माल ट्रक सारखी चारचाकी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करीत असतांना आरोपी कुणाल भरत तिवारी वय २६ तापी नगर के.नारखेडे शाळा जवळ,अक्षय श्यामकांत कुलकर्णी वय २३ लक्ष्मी नारायण नगर ३२ खोली रॉकेल डेपो,आवेश शेख बिस्मिल्ला वय २० जिया कॉलनी, मुज्जीमल शेख कलिम वय १९ विवेकानंद शाळे मागे तसेच एक आरोपी विधिसंघर्ष असे वाहनांवर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे मिळून आले म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच प्रभारी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या आदेशावरून गुरन २९५/२०२१ भाग -५ भा.द. वि.कलम ३९९,४०२,३७(१)(३) मुंबई पोलीस कायदा १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई बंटी कापडणे,योगेश माळी अशांनी मिळून केली.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला व गजनान वाघ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.