भुसावळ –
खंडवा येथील लाकूड व्यापा-याला शस्त्रांचा धाक दाखवत त्याच्याकडील तीन लाखांची रक्कम हिसकावून महामार्गावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून तीन धारदार चाकूंसह, मिरची पावडर व दरोड्याचे साहित्य, लूटीतील तीन लाखांची रोकड तसेच दोन चारचाकी तसेच आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहेत.
खंडव्याच्या व्यापार्याला लुटल्याने घटना उघड
खंडवा येथील लाकडाचा व्यवसाय करणार्या पासी नामक व्यापा-याकडून 16 रोजी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरून आरोपींनी तीन लाखांची रक्कम लांबवली होती. या घटनेची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्या वरून 16 रोजी रात्री 01:25 वा.सुमारास भुसावळ शहरात एक पांढ-या रंगाची एमपी पासींग असलेल्या गाडी मध्ये सहा ते सात गुन्हेगार यांनी दरोडा टाकुन त्यातील लुटलेली रोख रुपये ते आपआपसात वाटप करणार आहे व नंतर ते हायवे रोडवर येणारे जाणारे वाहन अडवुन दरोडा व चोरी करणार असल्याची माहिती मिळाली शहरात सर्वत्र संशयीतांचा शोध घेतला मात्र ते आढळले नाहीत. संशयीत महामार्गावरील हॉटेल न्यू पंजाब खालसा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचला. आरोपी जेवण करीत असताना पोलिस आल्यानंतर ते पळू लागले मात्र पोलिसांनी त्यांना जेरबंद केले .
आठही आरोपींच्या ताब्यातून तीन लाखांची रोकड, मिरची पूड, एक लाख रुपये किंमतीची चारचाकी इंडिका (एम.पी.10 सी.ए.2083) तसेच तीन लाख रुपये किंमतीची महिंद्रा व्हेरीटो (एम.एच.30 ए.एफ.4902, एक चाकु व दोन सुरे, लोखंडी पकड, स्क्रू ड्रायव्हर, सुती दोरीचे बंडल, 21 हजार रुपये किंमतीचे आठ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, एएसआय अंबादास पाथरवट, तस्लिम पठाण, सुनील थोरात, दीपक जाधव, संजय भदाणे, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, संदीप परदेशी आदींनी आरोपींना जेरबंद केले
यामध्ये डिगंबर वासुदेव कुचके (42, रा.हाथा, ता.बाळापुर, जि.अकोला), संतोष सुकलाल करमा (40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र.), दिलीपसिंग नथ्थुसिंग चव्हाण (40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र)), नारायणसिंग गोकुळसिंग राजपुत (44, रा.टोकसर, ता.बडवा, जि.खरगोन, (म.प्र), नाना जगन सोनी (37, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र), नंदलाल हरीप्रसाद विश्वकर्मा (46 ,रा.खडका ता.भुसावळ), शेषराव पांडुरंग राठोड (47 ,रा.शिरसोली, ता.तेल्हारा, जि.अकोला), अकबर उस्मान तंबोली (35, रा.बिंदिया नगर, खडका, ता.भुसावळ) यांचा समावेश आहे .सर्व आठही आरोपीतांविरुद्ध बाजार पेठ पोलीस ठाण्यात भाग 5 गु.र.न 235/19 भा.द.वि कलम 399,402, सह आर्म अँक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास सहा.फौ आंबादास पाथरवट करीत आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post