भुसावळात तापी तीरावर उत्साहात छट पूजन साजरे

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील  उत्तर भारतीय रहिवासी बांधवांनी  छट पूजन सण मोठ्या हर्षोल्हासाने व उत्साहात  येथील तापी नदी तीरावर रविवार 3 नोव्हेबर रोजी सकाळी 6 ते 11 दरम्यान साजरी केली. यावेळी भुसावळ छट पूजन समिती तर्फे पहाटे नदिवर भाविकांसाठी पूजन व्यवस्था करण्यात आली होती . भाविकानी पहाटे पासून तापी नदीवर पूजनास गर्दी केली होती . फिल्टर हाउस भागात  भुसावळ छट पूजन समिती तर्फे भाविकाना पोहे , जिलेबी सह प्रसाद वाटप करण्यात आले .यावेळी निरजा उदयसिंह काके ,शरद संजयसिंह  ,विलास उदय काके ,गोपी सिंह राजपूत ( जिल्हा अध्यक्ष बजरंग दल) प्रकाश सुशील तिवारी ,योगेंद्र हरणे ,गुड्डू गुप्ता ,धीरज कुमार , मुन्ना श्रीवास्तव यांचेसह  समस्त कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते .

दरम्यान छट पूजनास शुभेच्छा देण्याकरीता आमदार संजय सावकारे , राजेन्द्र आवटे, यांच्यासह नगरसेवक व पादाधिकारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.