भुसावळात डॉ. संतोष बोराडे यांचा जीवन संगीत कार्यक्रम

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने आयोजित करणाऱ्या ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे आगळावेगळा असा जीवनसंगीत हा व्याख्यान आणि संगीताची मेजवानी देणारा संगीत संध्या कार्यक्रम सोमवार, दि. २० जानेवारी  रोजी सायंकाळी ६.३० वाजता नाहाटा कॉलेजमागील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

यात पुणे येथील नॅचरोपॅथी म्युझिक थेरपिस्ट डॉ. संतोष बोराडे मार्गदर्शन करणार आहेत. संगीताच्या माध्यमातून जीवन जगण्याची कौशल्य याबाबत ते सविस्तर माहिती देणार आहेत. संगीताची आवड असणाऱ्या संगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुरेल जीवन संगीत व्याख्यान व संगीत मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानासह मनोरंजन गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.