Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळात टरबूजाच्या गाडीतून साडेआठ लाखांचा गांजा जप्त
    गुन्हे वार्ता

    भुसावळात टरबूजाच्या गाडीतून साडेआठ लाखांचा गांजा जप्त

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 4, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ | ​प्रतिनिधी

    ​टरबूजविक्रीच्या गाडीतून चक्क  गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांच्या  बाजारपेठ पोलिसांनी  मुसक्या आवळल्या .   ​नाहाटा महाविद्यालयाजवळ शनिवारी पहाटे या आरोपींच्या ताब्यातून सुमारे साडेआठ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली . या प्रकारामुळे शहरात  एकच खळबळ उडाली आहे.  ​गांजा तस्करी करणारा मुख्य मालक पसार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. शहरात गेल्या काही वर्षात प्रथमच मोठी कारवाई झाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील आरोपींमध्ये दोन सुरतच्या तर एका भुसावळातील आरोपीचा समावेश आहे. या गांजा तस्करीप्रकरणी शब्बीर कालेखान पठाण (40, अकबर की वाडी, खोलवड, ता.कामरीज, जि.सुरत), शेख अकील शेख लतीफ (34, बापूनगर, झोपडपट्टी खोलवाडा, ता.कामरीज, जि.सुरत) व शेख शरीफ शेख (33, मुस्लीम कॉलनी, उस्मानीया मशीदजवळ, भुसावळ) या आरोपीस अटक करण्यात आली. मुख्य आरोपी हमी समशोद्दीन पतंगवाला नवीन ईदगाहच्या पाठीमागे, भुसावळ हा पसार झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश रामदास धुमाळ, सहा.निरीक्षक अनिल छबूराव मोरे, हवालदार जिजाबराव पाटील, अयाज अली, सुनील सोनवणे, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, सुभाष साबळे, ईश्‍वर भालेराव, करतारसिंग पररेशी आदींच्या पथकाने केली. तपास सुनील सोनवणे, अनिल पाटील, किशोर महाजन करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराचा कट

    November 16, 2026

    धानोरा गवळी नाला परिसरात बिबट्याचा खुलेआम वावर

    November 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif