भुसावळात गोळीबार युवकाला मारण्याचा प्रयत्न ; दोघाना अटक

0

स्थनिक गुन्हे शाखा व बाजारपेठची संयुक्त कारवाई

भुसावळ :-  भुसावळ येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या जळगाव येथील  तरुणावर दोघांनी गोळीबार करून जखमी केल्याची घटना खडका रोड चौफुली येथे शनिवार रोजी रात्री  ८ वाजे दरम्यान घडली होती. या प्रकरणी आज पहाटे एलसीबीच्या पथकाने तपासचक्र फिरवीत दोघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक असे की खडका चौफुली वरील हॉटेल ग्रीन व्हू जवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास खलील अली शकील अली उभा असतांना त्याला शकील खान साबीर खान पठाण राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव हा भेटला असता त्यांच्या सोबत बोलत असतांना त्यांच्या जवळ अमोल ऊर्फ विक्की आलोने राहणार प्रतापनगर जळगाव हा आला व  धमकावू लागला की तू रेल्वेत चोरी करतो तुझी माहिती पोलिसांना देतो असे सांगून कमरेतील बंदूक बाहेर काढली.त्याच्या बरोबर सोबत असलेल्या मित्रानेही  हातात चाकू काढला तर  विक्की आलोने याने हातातील बंदुकीने दोन गोळ्या हवेत फायर केल्या.यामुळे फिर्यादी घाबरून पळू लागला. संशयित आरोपी विक्की याने फायर केल्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर दोन गोळ्या लागल्या यात तो  जखमी झाला. ही  माहिती मित्र एजाज खान ऊर्फ सोन्या  आयुब खान , राहणार जाम मोहल्ला याला कळविताच तो घटनास्थळी पोहचला व खलील अली शकील अली गंभीर जखमी झाल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनला कळविली.

जखमीला उपचारासाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटला उपचारार्थ रवाना करण्यात आले .दरम्यान फिर्यादी खलील अली शकील अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनला संशयित आरोपी खुशाल बोरसे आणि मयूर उर्फ विक्की दीपक अलोणे या दोघांविरुद्ध  बाजारपेठ पोलिस  स्टेशनला  गु.र.न.३९१/१९ भाग ५ ,भादवी कलम ३०७,५०४, ५०६,३४,२७(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान  पोलिसांनी खुशाल बोरसे आणि मयूर उर्फ विक्की दीपक अलोणे या दोघा आरोपीना  कालिंका माता मंदिर चौकातून रात्री ३ वाजता अटक करून बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले .  फिर्यादी आणि दोन्ही आरोपी हे गुन्हेगारी वृत्तीचे असून पैशांच्या वादातून ही  घटना घडली असावी असा संशय  पोलिसांनी व्यक्त केला  असून पुढील तपास निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय गुळींग करीत आहे.

यांनी केली कारवाई
एलसीबीच्या पथकातील पीएसआय सुधाकर लहारे, पीएसआय नाईक, हेकॉ विजयसिंग पाटील,नारायण पाटील,रामचंद्र बोरसे रविंद्र पाटील,अनिल देशमुख, अनिल इगंळे, पोना मनोज दुसाने, मायकल, मिलिंद सोनवणे, संदिप साबळे,आदींच्या पथकाने कारवाई केली .

Leave A Reply

Your email address will not be published.