भुसावळ (प्रतिनिधी)- : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत असले हाॕटेल यश ढाबा चालकाला शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याने ढाबाचालकांमध्ये खळबळ उडालेली असून शहरात पुन्हा एकदा खंडणीखोरांचा हैदोस सुरू झालेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,भगवान वामन वानखेडे रा. बालाजी तोल काट्याच्या पाठीमागे खडका रोड,भुसावळ यांच्या मालकीच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत पेट्रोल पंपाच्या समोरील यश ढाब्यावर दिनांक 20/12/2020 रोजी रात्री 11.30 ते12 वाजेच्या सुमारास आरोपी हाशिम शेख सलिम राहणार रिंग रोड भुसावळ,सिद्धार्थ श्रावण साळुंखे राहणार सत्यसाईनगर भुसावळ, दानिश रजउल्ला शेख रा. सत्यसाईनगर भुसावळ,चौथा आरोपी अल्पवयीन असून
फरार आहे.चौघांनी ढाबा चालकास शत्राचा धाक दाखवून 2,000 रुपयांची खंडणीची मागणी केली असता ढाबा चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याच्या कारणावरून आरोपींनी लोखंडी तलवार उलटी डोक्यात मारली. दुसऱ्याने लोखंडी रॉडने तर सोबतच्या साथीदाराने चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. या बाबत वानखेडे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुरुन 977/2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्यातील आरोपी हाशिम शेख सलिम व सिद्धार्थ श्रावण साळुंख दोघांना बाजारपेठ ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. मा.न्यायालयात हजर केले असता दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आलेली आहे. तर सिद्धार्थ श्रावण साळुंखे या आरोपीस दिनांक 01/01/2020 रोजी ताब्यात घेण्यात आलेले असून चौथा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश धुमाळ सह सुभाष साबळे करीत आहे.