भुसावळ (प्रतिनिधी )– कोरोना दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेचा अनुभव घेऊन आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. नववी ते बारावी शाळा उघडण्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल ११०० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सुरुवातीला कोरोनाचे हॉटस्पॉट झालेल्या भुसावळ शहरांमध्ये
नियोजनबद्ध कार्यक्रमानंतर आरोग्य प्रशासनाने, पालिका प्रशासनाच्या व पोलिस प्रशासनाच्या मदतीने बहुतांशी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यश मिळवले. हळूहळू कोरोना रुग्ण कमी होत असताना दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची या पार्श्वभागीय चाचणी आरोग्य प्रशासनासह पालिका व पोलीस प्रशासन सज्ज आहे. पहिल्या लाटेचा कोरोना अनुभव हाताशी असल्यामुळे दुसऱ्या लाटे विषयी पाहिजे तितकी भीती नागरिकांच्या तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात नाही मात्र तरीही गाफील न राहता पूर्वीच सुरू असलेले कोविड केअर सेंटर अद्यापही सुरू आहे.शहर व तालुक्यात पालिका
रुग्णालय, ट्रामा सेंटर, वरणगाव, किन्ही कठोरा, वराडसिम, पिंपळगाव या ठिकाणी दररोज स्वॅब घेण्यात येतात याशिवाय तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस स्वब तपासणी करण्याकरीता ठरविन्यात आलेला आहे.