भुसावळात ऐतिहासिक निकाल ; आ.संजय सावकारे यांची हॅट्रिक !!

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  भुसावळात विधानसभा निवडणुकीसाठी आखाडा गाजला व 48 टक्के एवढेच  अत्यल्प मतदान झाल्याने कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता सर्वाना लागली असतानाच भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी विजयश्री खेचून आणून हॅट्रीक साधली. प्रतिस्पर्धी महाआघाडीचे उमेदवार जगन सोनवणे व अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांचा त्यांनी दारुण परावभ केला. सुमारे 54 हजारांचा लीड त्यांनी मिळवला. ऐतिहासीक विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आमदार संजय सावकारे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

पहिल्या फेरीपासून मतांची घेतली आघाडी

नवीन प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजेपासून मतमोजणीला प्रत्यक्षात प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून आमदार संजय सावकारे यांनी मताधिक्यात आघाडी घेतली होती मात्र आठव्या व नवव्या फेरीत मात मताधिक्यात काहीशी घट झाली मात्र 17 व्या फेरीत आमदारांनी त्यांचाच मागील निवडणुकी तील 34637  मतांचे रेकॉर्ड तोडत 35हजार 280 मतांची आघाडी घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.