भुसावळ (प्रतिनिधी)-: शहरातील सिंधी काॅलनी परीसरात गुरूवारी रात्री ११.३० वाजता काहीही कारण नसतांना झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी माेटर सायकलवरआलेल्या तिन्ही जणांनी एका जणांच्या हातावर चाकूने वार केले. यात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पाेलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिंधी काॅलनीतील नानक नगरातील रहिवासी राेशन नारायण चुंग (२२) हा गुरूवारी रात्री ११.३० वाजता तेथे उभा असतांना मनिष रत्नानी, तरूण कुकरेजा हे त्यांच्या साेबत असतांना हर्षल संजयकुमार सावकारे (रा.एसबीआय बॅकेसमाेर, पुणे), आनंद पवार (रा. कंडारी) व रितीक ढिक्याव (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) हे आले व वाद झाले.
यावेळी हर्षल यांने त्याच्याजवळील चाकूने वार केला. यात राेशन याच्या बाेटाला इजा झाली. याप्रकरणी बाजारपेठ पाेलिसांना माहिती मिळताच पाेलिस निरीक्षक भागवत व सहकारी यांनी सिंधी काॅलनीत धाव घेतली. राेशन चुंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पाेलिस ठाण्यात हर्षल सावकारे, आनंद पवार, रितीक ढिक्याव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. पाेलिसांनी तिन्ही जणांनाअटक केली. पाेलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर पुढील तपास करीत आहे.