भुसावळ | प्रतिनिधी
येथील जुग्याचे देवी परिसरातील मोहित नगर भागात साधारण दिड वर्षाचे हरिणाचे पाडस मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.
30 मे रोजी सकाळी मोहितनगरच्या एका मोकळ्या मैदानावर हे पिल्लू मृतावस्थेत पडलेले येथील काही नागरिकांना दिसले हे हरीण पाण्याच्या शोधात रस्ता चुकले असावे . मोहितनगर नजीकच जुग्याचा देवी हा सुमारे पाच ते सात मीटरचा पट्टा असलेला जंगलाचा भाग आहे . वाढत्या तापमानामुळे तहानलेल्या या पाडसाचा पाण्याच्या शोधात रात्रीच्या अंधारात रस्ता चुकला मात्र या पाडसाची आयती शिकार मिळाल्याने गावातील मोकाट कुत्र्यांनी लचका तोडीत फडशा पाडल्याने हे हरणाचे पाडस मृत झाले असावे असा अंदाज नागरिकांसह वनअधिकारी आशुतोष बच्छाव यांनी व्यक्त केला. दरम्यान मोहितनगरमधील नागरिकांनी त्वरित वनविभागाला या घटनेचे वृत्त कळविले . घटनास्थळी त्वरित वनविभागातील कर्मचारी बी एन पवार , एस आर चिंचोले, तुषार भोळे , विलास पाटील, हंसराज चव्हाण, यांनी धाव घेऊन पाहणी करीत पंचनामा केला तर किन्ही येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत वाघोदे यांनी या पाडसाचे शवविच्छेदन केले . तर हरणाचे पाडसावर अंत्यसंस्कार सोपस्कार वनविभाग कर्मचा-यांनी केले.