भुसावळ :- ड्राय डेच्या दिवशी शहरात अवैधरित्या दारू विक्री करणा-या दोन जणांना पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून मद्याचा साठा जप्त केला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निवडणुकीनिमित्त जिल्ह्यात मद्यविक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही दि. २२ रोजी दुपारच्या सुमारास जामनेररोड भागातील सोनिच्छावाडी कृष्णा नगर परिसरात तसेच जामनेर रोडवरील भारतीय स्टेट बँक आनंद नगर शाखा जवळ दोन जण हे गैरकायदा विना परवाना देशी व विदेशी दारुची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती.
या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौ आंबादास पाथरवट, पो.ना.नरेंद्र चौधरी, पो.काँ कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. यातील पहिला गणेश अशोक पवार (वय- २८ रा. कृष्णा नगर सोनिच्छावाडी जवळ जामनेर रोड भुसावळ) तर दुसरा पिंटु रामधन शिरसाठ (वय- २८ रा. सिंधी कॉलनी जामनेर रोड भुसावळ) असे असल्याचे निष्पन्न झाले. यातील पहिल्याजवळ ७,४८८/- रु.कि.च्या देशी टँगो पंच कं.च्या ५२ बाटल्या व २,६००/- रु.कि.च्या टँगो पंच कं.च्या १०० प्लाँस्टीकच्या बाटल्या असा एकूण एकुण १०,०८८ रूपयांचा माल आढळून आला. तर दुसर्या जवळ ५,५२०/- रु.कि.च्या ऑफिसर चाँईस कं.च्या ४६ बाटल्या; ४,५५० रु.कि.च्या मास्टर ब्लाइंड कं.च्या ३५ बाटल्या व २,०८० रु.कि.च्या देशी टँगो पंच कं.च्या ४० बाटल्या असा एकूण १२,१५० रूपयांचा माल आढळून आला.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात प्रोव्हीशन गु.र.न २४०/२०१९ , २४१/२०१९ ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या दोन्ही गुन्हयांचा तपास पो.ना.नरेंद्र चौधरी करीत आहेत.