भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहरातील अमृत योजनेकरिता पालिकेने पाईप लाईन खोदली असून याचा ताप नागरिकांसह आता मोठया वाहनधारकास सुद्धा होत आहे. मंगळवार 11 रोजी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.09 एच.एच.6874) यावल रस्त्यावरील साईजीवन सुपर शॉपसमोर फसला.यामुळे वाहतुकीस काही काळ खोळंबा झाला होता.
शहरात अमृत योजनेचे संथ गतीने काम सुरू असून यावल रस्त्यावरील मेन रायझिंगची पाईप लाईन काढण्यात आल्यानंतर व्यवस्थीत दबाई झालेली नाही यामुळे ही दलदल चटकन लक्षात न आल्याने ट्रक या खड्ड्यात फसला. यावल रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन होवूनही प्रत्यक्षात डांबरीकरण होत नसल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.

