भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. तसेच भुसावळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली. त्यावर देशमुख यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.