भुसावळातील संत पॉल चर्च ; ख्रिस्त जन्मोत्सवाची जय्यत तयारी

0

भुसावळ (प्रतिनिधी)- नाताळ अर्थात ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मीय बांधवांचा एक महत्वपूर्ण सणज़ उत्सव आहे . २५ डिसेंबर हा येशुचा जन्मदिवस म्हणून यादिवशी नाताळ साजरा करण्यात येतो .ख्रिश्चन धर्मानुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरूवात करतो . या सणाला ख्रिश्चन लोक फार महत्व देतात कारण जिझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे याकरीता नाताळ हा आनंद व उल्हासाचा सण असून तो संपूर्ण जगभरात साजरा करण्याची परंपरा सुमारे ७०० ते ९०० वर्षापूर्वी पासून सुरु आहे . या अनुषंगाने शहरात नाताळ पर्वानिमित्त विविध चर्चमध्ये कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

विविध भरगच्च कार्यक्रम
शतकाकडे वाटचाल करणाऱ्यांभुसावळातील संत पॉल चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून यानिमित्त चर्चतर्फे कॅरल सिगिंगसह विविध स्पर्धांचे आयोजन २डिसेंबर ते 1 जानेवारी २०२० दरम्यान करण्यात आले आहे. यातचर्चची रंगरंगोटी व सजावट करण्यात येत आहे. या अंतर्गत श्रमदान, चर्च डेकोरेशन,१९ ते २२ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी पाच ते रात्री १० वाजे पर्यंत कॅरल सिगिंगचा कार्यक्रम २३ रोजी श्रमदान व राहिलेले कामे ,२६ रोजी खेळ स्पर्धा , २७ रोजी चित्रकला स्पर्धा , २८ रोजी निर्दोष बालकांचा सण, व कुटुंबासाठी प्रश्न मंजूषा स्पर्धा , २९ रोजी संडे स्कूल, तरुण संघ महिला मंडळ पुरुष मंडळ यांचेतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम , ३० रोजी धार्मिक चित्रपट,३१ डिसेंबर रोजी ५ वाजेपासुन फँन्सी ड्रेस स्पर्धा , १ जानेवारी २०२० नव वर्षा निमित्त प्रिती भोजन व बक्षीस समारंभ, यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वागतार्थ जय्यत तयारी
नाताळ निमित्त चर्च रंगरंगोटीसह ,आकर्षक विद्युत रोषणाई , डेकोरेशन , रंगबेरंगी ख्रिसमस ट्री, जिंगल बेल,सांटाक्लोज, यासह विविध वस्तुनी चर्च सजावट करण्यात येत आहे . कार्यक्रम यशस्वितेकरिता प्रिस्ट इन चार्ज
रेव्ह. किशोर अशोक गायकवाड, असो. प्रिस्ट रेव्ह डायना किशोर गायकवाड, खजिंनदार (इंग्रजी मंडळी ) विनित केकाळ , सचिव (इंग्रजी मंडळी ) लुई कॉनेल , तसेच (मराठी मंडळी ) सचिव मॉरिस मिसाळ , (मराठी मंडळी ) खजिंनदार विजय साळवी , यांचे मार्गदर्शनाखालीपास्टोरेट कमिटी अनिल ठोंबरे , चार्लस मिसाळ , बेन्यामिन गुढेकर, विल्यम गायकवाड़, प्रदिप घुले , सुनीता शिंदे, हेमलता गायकवाड़ , डिंपल औताडे, रचना शिरसाठ, यासह संडे स्कूल ,तरुण संघ , ख्रिस्त सेवा महिला मंडळ व सर्व चर्च सभासद यशस्वितेकरिता परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here