भुसावळातील वॉटर पार्कमध्ये तरुणाचा मृत्यू

0

वॉटर पार्कमध्ये बुडून वारल्याचा नातेवाईकांचा आरोप, वाटर पार्क ने आरोप फेटाळला

भुसावळ –
शहरातील अलिशान वॉटर पार्कमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 17 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या तरुणास येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत्य घोषीत केले. वॉटर पार्क मधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे मात्र या आरोपाला वॉटर पार्क व्यवस्थापनाने नकार दिला आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण समजणार असल्याने या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
जळगाव शहरातील रहिवासी असलेले अमर दिगंबर तायडे (वय 35) रा वाघ नगर जळगाव हे रविवारी सुटी होती. त्यामुळे या सुटीचा आनंद परिवारासोबत घेण्यासाठी ते पत्नी, मुलगा, मुलगी व मेहुण्यासह कंडारी शिवारातील अलिशान वॉटर पार्कमध्ये आले होते. वॉटर पार्क मध्ये सर्वांनी आनंद लुटला. यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तायडे यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना उलटी झाली. हे पाहताच कुटुंबीयांनी त्यांना दुचाकीवरून शहरातील हृदय रोग तज्ञ डॉक्टर राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात हलवले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अमर तायडे यांना मयत घोषित केले. तायडे यांना डॉक्टरांनी मृत घोषीत करताच नातेवाईकांनी एकच हबरडा फोडला. याबाबत डॉ. राजेश मानवतकर यांनी दिलेल्या खबरीकवरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान , मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे . शवविच्छेदन अहवाला आल्या नंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. नातेवाईकांनी मात्र, वॉटरपार्कमध्ये प्रशिक्षक नसल्यामुळे तायडे यांचा बुडून मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.