भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळातील आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था असलेल्या मेसॉनिक लॉजची जमीन हडपण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत असल्याप्रकरणी वस्तुस्थिती तपासून उचित कार्यवाही करावी, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जळगावच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहे तर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी याचप्रकरणी चौकशी करण्याचे पत्र मंत्री थोरात यांना आधीच दिले आहे.
मिळकती गिळकृंत करण्याची तक्रार
मेसॉनिक लॉजच्या मिळकती गिळंकृत करण्यासाठी काही मंडळी सक्रीय आहेत. मिळकतीचे संरक्षण करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मेसॉनिक लॉजचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. कब्रस्थानासाठी वापर केल्या जाणार्या पारशी अंजुमन फंड या संस्थेच्या अन्य जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत असून त्यांचे संरक्षण करण्याची मागणी, डॉ.नरिमन रुसी कावीना यांनी राज्यपाल यांना 30 नोव्हेंबरला निवेदनाद्वारे केली आहे.