भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील चाळीस बंगला भागातील युवतीला ओएलएक्स अॅप्लीकेशनवरुन स्कुटी घेण्यासाठी गुगल पे द्वारे 25 हजार रुपयांची फसावणूक झाल्याची घटना दि.22 रोजी दुपारी लक्षात आली. याबाबत बिहारच्या तीघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, येथील 40 बंगला भागातील रहिवासी विनोदकुमार हनुमानशरन समाधिया (वय 55) यांच्या मुलीच्या मोबाईलवर आरोपी सिमांक कुमार (पूर्ण नाव माहित नाही) (रा. बालाजी मेडिकल, घर नं. 83 वार्ड क्र.8, अटारी लौकाहा मधुबने बिहार),राजकुमार कैलास व राजेशकुमार (दोघांची पूर्ण नाव माहित नाही) यांनी विनोदकुमार यांनी संगनमताने ओएलएक्स ऍप्लीकेशन वरुन स्कुटी घेण्यासाठी समाधिया यांच्या मुलीच्या मोबाईलवरुन गुगल पे द्वारे 25हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याबाबत विनोदकुमार समाधिया यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गु.रं.नं.35/20, भा.दं.वि. 420/ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक बंटी सैंदाणे करीत आहे.