भुसावळातील युवकाचा झोपेतच मृत्यू

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील जळगाव रोडवरील अयोध्या नगरातील रहिवासी असलेल्या एका 28 वर्षीय विवाहित युवकाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन वामन झाडगे (28) हा कुटुंबियांसह अयोध्यानगरात वास्तव्यास होता. चेतन हा मिळेल काम करून आपल्या कुटुंबास आर्थिक हातभार लावत होता. बुधवारी दुपारी तो घरात झोपला मात्र सायंकाळ होवूनही तो जागी न झाल्याने त्यास उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृत झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.