भुसावळातील बाजारपेठेत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

0

भुसावळ :- शहरातील भर बाजारात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.  विशेष म्हणजे घटनास्थळी एक दगड मिळाला पण, त्यावर कसलेही नामोनिशान दिसले नाही. ही बातमी बाजारपट्ट्यात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी गर्दी केली हाेती. दरम्यान तरुणाची अोळख पटली नसून त्याचा मृत्यूचे कारण समजून अाले नाही.

बाजारपेठेतील डीस्काे टाॅवरच्या मागे सदगुरू रेडीमेड स्टाेअर्सच्या बाजूच्या बाेळात एका घराच्या भिंतीजवळ अनाेळखी तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थाराेळ्यात पडला अाहे, अशी माहिती मिळताच बाजारपेठ पाेलिसांना घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वी व्यापाऱ्यांची गर्दी झाली होती.

घटनास्थळी डीवायएसपी गजानन राठाेड, पाेलिस निरीक्षक देवीदास पवार यांनी भेट दिली. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप इंगळे यांनी घटनास्थळीच मृताची तपासणी केली. नंतर मृतदेह पालिका दवाखान्यात रवाना केला. मृताच्या अंगावर कुठेही जखमा नसल्याचे तपासणीत समाेर अाले. याप्रकरणी सुमीत अासरानी यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद केली अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.