भुसावळातील तरुणाचा दगडाने ठेचून खून प्रकरणी १९ वर्षीय तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील लिंपस क्लब परिसरात एका ३४ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना काल सर्वत्र गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होत असताना उघडकीस आली होती.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, घटनेच्या अवघ्या काही तासात खुनाचा तपास लावून तीन संशयिताना अटक करण्यात आली आहे. अजय अशोक पाठक (वय १९, ऑर्डनन्स फॅक्टरी परीसर, भुसावळ), पंकज संजय तायडे (वय १९, राहुल नगर, भुसावळ) व आशिष श्रीराम जाधव (वय १९, श्रीराम नगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.

दरम्यान, खुनामागे अद्याप ठोस कारण निष्पन्न झाले नसलेतरी शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी हा खून केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. मात्र सर्वच बाजूने पोलिसांकडून तपास केला जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परीषदेत दिली.

मंगळवार दि.१३ रोजी दुपारी शहरातील लिंपस क्लब, हनुमान मंदिर समोर असलेल्या मोकळ्या जागेत संदीप गायकवाड (वय ३४, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अत्यंत बारकाईने गुन्ह्याचा तपास करीत अवघ्या आठ तासात गुन्ह्याची उकल करून तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे मयत व अटकेतील आरोपींची कुठलीही गुन्हेगारी नाही, केवळ किरकोळ वादातून त्यांनी हा खून केल्याची बाब पुढे आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अर्चित चांडक, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुणगहू, शहर व बाजारपेठचे हवालदार राजेश बोदडे, हवालदार संजय सोनवणे, हवालदार मो.वली सैय्यद, सोपान पाटील, जुबेर शेख, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

Leave A Reply

Your email address will not be published.