Saturday, December 3, 2022

भुसावळातील डॉक्टरांकडे आयकर विभागाचे छापे

- Advertisement -

भुसावळ :- शहरातील पांडुरंग टॉकीजजवळील जयंत हॉस्पीटलसह जामनेर रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाजवळील कोळंबे हॉस्पीटलवर आयकर विभागाच्या पथकाने ११ रोजी सायंकाळी अचानक धाड टाकली. या धाडीमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाच्या अधिकार्‍यांकडून कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू होती. मात्र नेमकी काय कारवाई झाली व काय घबाळ बाहेर आले याबाबत माहिती कळू शकली नाही.

- Advertisement -

शहरातील पांडुरंग टॉकीजमागे डॉ.जयंत धांडे यांच्या जयंत हॉस्पीटल व जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या कोळंबे हॉस्पीटलवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली. पाच ते सहा अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या अधिकार्‍यांच्या पथकाने अचानक हॉस्पीटलमध्ये शिरत कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू केल्याची माहिती शहरात कळताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. कारवाई नेमकी कशामुळे केली हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. साबंधिक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु असून चौकशी अंती कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. या कारवाईत नेमके काय आढळून आले अद्याप याबाबत माहिती कळू शकली नाही. परंतु या धाडीमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या