भुसावळ :
शहरातील डीआरएम कार्यालयात कोरोनाने प्रवेश केला असून बुधवारी डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आलेल्या 171 स्वॅब तपासणीत तब्बल 31 कर्मचार्यांचे तपसाणीअंती अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर डीआरएम कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. डीआरएम कार्यालयातील विविध विभागातील दररोज एक ते दोन कर्मचारी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. याच पार्श्वभुमीवर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी 11 वाजेपासून डीआरएम कार्यालयातील आतील प्रवेशद्वाराजवळ कर्मचार्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली.
31 कर्मचारी निघाले बाधीत
बुधवारी 171 विविध विभागातील कर्मचार्यांची स्वॅब तपासणी झाली. याच तपासणीत 171 पैकी 31 कर्मचार्यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. यामुळे डीआरएम कार्यालयातील कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली. तीन ते चार दिवस दररोज डीआरएम कार्यालयात स्वॅब तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. यामुळे डीआरएम कार्यालयात सर्वच कर्मचार्यांची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. कर्मचार्यांसोबत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचीही तपासणी केली जाणार आहे.
डीआरएम कार्यालयातील कर्मचार्यांना त्यांची कामे तीन शिफ्टमध्ये विभागून दिली आहे. यात 7 ते 12, 1 ते 6 व महिलांसाठी 10 ते 4 अश्या तीन वेगवेगळ्या शिफ्ट ठरवून दिल्या आहे. ही अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली आहे. वर्कफॉर्म होम केले जाणार आहे.
घरी विलगीकरण कक्षात रवाना
जे कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह आले आहे त्यातील काही रेल्वे हॉस्पीटल तर काही होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचार्यांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था आहे, त्यांना उपचार देऊन घरी सोडले आहे. त्यांची दररोज रेल्वे हॉस्पीटलकडून माहिती घेतली जाणार आहे.
स्टेनो, लिपिक, शिपाईचा समावेश
बुधवारी करण्यात आलेल्या कोरोना स्वॅब तपासणीत आलेल्या 31 पॉझिटिव्हमध्ये डीआरएम कार्यालयातील लिपीक, स्टेनोसह शिपाईचा समावेश आहे. ही मोहिम अजून दोन ते तीन दिवस राबविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर डीआरएम कार्यालयाच्या आवारात सॅनेटायझरींग केले जात असून
या कार्यालयातील पाचशेपैकी २५६ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
यासंबंधी डीआरएम ऑफिसमध्ये काळजी घेण्यात येत असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वेचे अपर मंडळ अधीक्षक मनोज सिन्हा यांनी दिली आहे .