भुसावळातील ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र फिडरची आवश्यकता: प्रा.धिरज पाटील

0

भुसावळ : येथे ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास ९५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत कामांमध्ये प्रामुख्याने विज समस्या सोडवण्यासाठी एक्सप्रेस फिडर आणि उच्चदाब असलेले ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त जनरेटर सार्वजनिक आरोग्य विभागाने बसवावे अशी मागणी विभागाकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे.

शिवसेना पाठपुरावा करणार:

कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वाजेपासून रुग्णालयात विजेअभावी लसीकरण होऊ शकले नाही, नागिरीकांना दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी फेऱ्या माराव्या लागल्या. इमारतीचे जवळपास ९५ टक्क्यापेक्षा अधिक बांधकाम झाले असून, नियोजन नसल्याने विद्युत उपकेंद्र, एक्सप्रेस फिडरची उभारणी, अग्निशमन यंत्रणा, वातानुकुलीत यंत्रणा व अन्य सुविधांची कामे खोळंबली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील व पदाधिकारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

स्वतंत्र एक्सप्रेस फिडरची आवश्यकता:

रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा आहे सतत वीज खंडित होत असल्यामुळे रुग्ण दगावू शकतो. इथे फिडर स्वतंत्र नसल्यामुळे वीज खंडित झाली महावितरणकडून लवकर कार्यवाही होत नाही, येथे स्वतंत्र फिडरची आवश्यकता आहे म्हणून आरोग्य विभागाकडे मागणी केली असे प्रा. धिरज पाटील यांनी कळविले आहे..

दरम्यान 80 पेक्षा जास्त खाटांचे कोरोना रुग्ण दवाखान्यात दाखल करून घेण्याची तयारी ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे,  देव न करो कोणाला जरी, ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लागला तर तो रुग्ण दगावू शकतो, नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आज तेथे आले होते, त्यांच्याशी याबाबत धिरज पाटिल यांनी चर्चा करून माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.