भुसावळातील गोतस्करांचा बंदोबस्त करावा !

0

भुसावळ | प्रतिनिधी  

भुसावळातील गोतस्करांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येथील गोसेवक समिती परिवारातर्फे  प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.  निवेदनात नमूद आहे की , गेल्या काही दिवसांपासून शहरातुन मध्यरात्रीला चार ते पाच जणांची टोळी  खाजगी वाहनातुन गोमातेची  सर्रास तस्करी करीत  आहे .या खाजगी वाहनाला नंबर प्लेट नसुन त्या वाहनातील मागील सीटस काढुन त्यामध्ये गोमातेची वासरे आणि बेशुध्द अवस्थेत गोमाता कोंबलेल्या असतात.तसेच या गोतस्काराकडे नाना प्नकारची हत्यारे देखील असतात यामुळे  गोमाता पालका मध्ये व सामांन्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  सदर  चोरी घडलेला प्नकार  या झालेल्या भागातील रहिवासी नागरिकांनी गोमाता भक्ताना कळविला यासाठी अश्या गोतस्काराचा  शासनाने शोध घेवून  त्यांचेवर  कठोर शिक्षा करावी जेणेकरुन गोमाता व  वासरे सुखरुप राहतील,   गोमातेला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे गोसेवकांनी केली आहे .  निवेदन देताना  यावेळी सौ राजश्री  नेवे, वंदना  झांबरे ,दर्पणा कुलकर्णी  गौसेवक रोहित महाले, प्रणव डोलारे,अनिकेत साळी, दुर्गेश झोपे, सुरज ठाकुर, मोहित देसाई सर्व गौसेवक समिती परिवार सदस्य उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.