7 जण जागीच ठार भुसावळच्या 4 जणांचा समावेश
भुसावळ :- येथील लिम्पस क्लब जवळील रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात कंट्रोल रूम येथे कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल मिलिंद देशमुखवय 43 हे पत्नी किरण देशमुख व दोन मुलांसह अजिंक्य व आदित्य वय 10 व वय 13 वर्ष यांचेसह फिरावयास गेले होते .त्यांचे सोबत त्यांचा भाऊ व वहिनी व चालक असे एकूण 7 जण होते दिनांक 6 मे रोजी तामिळनाडू येथील वेल्लोर जिल्ह्यातील अंबुर गावानजीक दुपारी पावणे तीन वाजेचे सुमारास कारचे चाक फुटले व ती कार समोरच्या ट्रेलरवर जाऊन आदळ ली या दुर्दैवी अपघातात भुसावळ येथील आरपीएफ देशमुख यांचेसह पत्नी व 2 ही मुलांसह भाऊ वहिनी व चालक यांचा जागीच मृत्यू झाला .या घटनेचे वृत्त शहरात येऊन धडकताच आरपीएफ कॉलनी व परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक गंगोत्री नगर येथे आर बी आय 66/5 A एच येथे गेल्या 10 वर्षांपासून मिलिंद देशमुख वय (40) हे तयांची पत्नी किरण देशमुख मुलगा आदित्य(11) इयत्ता 8वी व अजिंक्य (8)हा इयत्ता 5वी यांचे सह राहत होते . 28 व 29 एप्रिल6 रोजी हे सर्व सुट्ट्यांमध्ये स्विफ्ट कार घेऊन बालाजी दर्शनाला गेले होते आधी बिंगळुरू येथे भावाचे घरी गेले व नंतर बालाजी दर्शनाला जाताना त्यांचा अपघात झाला . त्यांचे सोबत त्यांचा भाऊ हेमंत देशमुख वहिनी सारिका देशमुख व गाडी चालक (नाव माहीत नाही ) असे 7 जण गाडीत होते . दुपारी अचानक झालेल्या या भयानक अपघातात काळाने घाला घातला. व यात सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
सुट्या लागण्यापूर्वी व गावाला जाण्या आधी नुकताच अजिंक्य याचा वाढदिवस आनंदाने साजरा करण्यात आला होता.