भुसावळ :- महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळात आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्णमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांना विविध विषयांवरून प्रश्न विचारण्यात आले. त्यात भुसावळ शहराला जिल्हा करणार का? असा प्रश्न यावेळी माध्यमांद्वारे उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सूचक उत्तर दिले.
ते म्हणाले, भुसावळ जिल्हा निर्मितीसाठी मेरीट समिती तयार करण्यात आली असून या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एकाच वेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिल्हा निर्मिती करण्यात येईल, असे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे भविष्यात भुसावळ नक्की जिल्हा होईल, अशी आशा बाळगणा-या शहरवासीयां तूर्तास दिलासा देण्याचे काम त्यांनी केल.
पत्रकार परिषदेला यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार विकास सुखात्मे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ .राजेंद्र फडके,भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर ,महाजनादेश यात्रेचे समन्वयक सुजाण सिंग आदीं उपस्थित होते .
महाजनादेश यात्रेनंतर भुसावळकरांना संबोधित करतांना आपण एमआयडीसी प्रकल्पाबाबत शासनाची कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नाही. जर एखादा मोठा प्रकल्प या भागात आला तर पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम मध्यप्रदेश येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होउ शकतो याबाबत येथे आपण घोषणा करणार का? जेणे करून उपरोक्त भागातील बेररोजगारांचे मुंबई, पुणे, नाशिक, आदी शहरांकडे होणारे विस्थापन कमी होईल. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत शासन गंभीर असून भुसावळ एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रकल्प उभारणी बाबत शासन विचाराधीन राहील राज्य सरकार लवकरच भुसावळ-जळगावसासाठी लक्ष घालणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.