Saturday, December 3, 2022

भुसावळच्या महिलेचा मृतदेह शिरपुर नदी पात्रात आढळला !

- Advertisement -

रागात सोडले घर ; आत्महत्या केल्याचे उघडकिस ; अवघ्या १२ तासात नातेवाईकांचा शोध

- Advertisement -

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील वांजोळा रोड  भागातील रहिवासी ४२  वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह धुळे जिल्हयातील शिरपुर तालुक्यातील थारनेळ येथील  कुरखळी नदित 11 ऑगष्ट रोजी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . मात्र ही महिला हरविल्याची खबर बाजारपेठ पोलिसात दिल्यामुळे  सोशल मिडियाच्या सहाय्याने महिलेची ओळख अवघ्या १२ तासात  पटली  आहे .ओळख पटल्याने शवविच्छेदना नंतर महिलेचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला .

- Advertisement -

- Advertisement -

इंदुमती सतिश कवडे (वय ४२ ) रा वांजोळा रोड , दत्त नगर येथे राहत होती , दिनांक ९ऑगष्ट रोजी रात्री घरातील कौटुबिक वादात इंदुमती सतीश  कवडे रागाने संतापात घर सोडून बाहेर पडल्या .घरच्यानी सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्या सापडल्या नाहीत म्हणून बाजारपेठ पोलिसात हरविल्याची नोंद केली होती . दरम्यान थाळनेर शिरपुर तालुक्यातील कुरखळी येथे तापी नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

वांजोळा रोड भागातील  दत्त नगर भुसावळ येथील महिला इंदुमती सतिश कवडे वय ४२ ह्या गेल्या दाेन दिवसापासून काैटुंबीक कलहातुन रागाच्या भरात बेपत्ता हाेत्या. घरात नेहमी हाेणाऱ्या पती पत्नीच्या भांडणाला कंटाळून त्या  दिनांक ९ रोजी संतापाच्या भरात घरातुन निघाल्या व त्यांनी तापीच्या प्रवाहात उडी घेतली. काल त्यांचे प्रेत कुरखळी येथे तापी नदी पात्रात आढळून आले. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शाेध घेतला मात्र त्या आढळून आल्या नाहीत. याप्रकरणी  बाजारपेठ पाेलिस ठाणे भुसावळ येथे हरविल्याची नाेंद करण्यात आली होती .

दरम्यान काल दुपारी थाळनेर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुरखळी ता. शिरपुर येथे तापी नदीच्या प्रवाहात अनाेळखी महिलेचे पाण्यात बुडून मृत पावलेले प्रेत आढळून आल्याची खबर कुरखळीचे पाेलिस पाटील वसंत बिल्हाळे यांनी थाळनेर पाेलिस स्टेशन येथे दिली. त्यानुसार थाळनेर पाेलिसांनी स्थानिकांच्या मदतीने हे प्रेत बाहेर काढले.  व पंचनामा केला. मात्र हे प्रेत नेमके कुणाचे? हा प्रश्न पाेलिसांपुढे हाेता. जिल्हा पाेलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली  अप्पर पाेलिस अधिक्षक  राजू भुजबळ यांच्या सुचनेनुसार थाळनेर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी तपासाला गती दिली. व साेशल मिडीयाच्या माध्यमातून प्रेताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. दुपारी दाेन वाजेच्या सुमारास श्री. साळुंखे यांना मृताचा मुलगा यांनी फाेन करून त्यांनी मृताची ओळख दिली. सदर प्रेत हे माझी आई इंदुमती सतिष कावळे यांचे असुन त्यांनी रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानुसार थाळनेर येथे अकस्मात मृत्यू 33/2019 नुसार नाेंद करण्यात आली. तर प्रेताचे उपजिल्हा रूग्णालय शिरपुर येथे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अवघ्या बारा तासाच्या आत साेशल मिडीयाच्या माध्यमातून थाळनेर पाेलिसांनी इंदुबाई यांची ओळख पटवुन प्रेत ताब्यात दिल्याने सहाय्यक पाेलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांचे कामाचे वरिष्ठांनी कौतुक केले. तर कुरखळी चे पाेलिस पाटील वसंत बिल्हाळे व पिंप्री चे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी तपास कामात पाेलिसांना सहकार्य केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या