भुसावळ – जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा !! या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव भुसावळ येथे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये दिसला. पत्रकार व छायाचित्रकार यांच्या दडलेल्या हळव्या व भावनाप्रधान मनाने एका व्यथीत वृद्ध महिलेची तब्बल 10 वर्षानंतर तीच्या कुटुंबासोबत भेट घडवून तीला त्यांचे स्वाधीन करुन मानुसकीचे दर्शन घडविले.
कोरोना व्हायरस सारख्या भयंकर आपत्तीजनक परिस्थितीत सुध्दा पत्रकार आपली महत्त्वाची भूमिका अतिशय जबाबदारीने आणि सजगपणे बजावत असताना दिसत आहेत. पत्रकार बांधव सदैव तत्पर राहून प्रत्येक घटनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य अविरत पणे करताना दिसत आहेत. अश्या परिस्थितीत केवळ वृत्तसंकलन व फोटोग्राफी करणे एवढाच हेतू मनात न बाळगता जळगाव जिल्ह्यातील वृत्तवाहिनीचे पत्रकार व लोकमत वृत्तपत्राचे छायाचित्रकार श्याम गोविंदा,इम्तियाज अहमद व मंगेश जोशी या तिघांच्या प्रयत्नांनी गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर झालेल्या एका दिनदुबळ्या वृद्ध महिलेला आपल्या कुटुंबा सोबत भेट करून देत माणुसकी जोपासली.
पत्रकारांचे आभार
त्या माहिलेच्य भावाने भुसावळातील तीनही पत्रकारांचे आभार माननले,तुमच्या मुळे बहीणीची भेट झाली. निजामपूर जि.धुळे येथील ७० वर्षीय वृध्द महिला रंजनाबाई दत्तात्रय चिंचोले ही वृद्ध महिला १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून विभक्त होत त्या भटकत होती. पत्रकारांनी प्रयत्न केल्याने त्या वृद्ध महिलेचे भाऊ व नातेवाईक त्यांना घेण्यास आज भुसावळ येथे आले होते. नगरपालिका रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करून छायाचित्रकार श्याम गोविंदा,मंगेश जोशी,इम्तियाज अहमद यांनी या वृद्ध महिलेला जिल्हा सीमेवर त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले.