Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळचे डॉ. तुषार पाटील यांचे प्रिक्वॉलिफाईड रन स्पर्धेत यश
    जळगाव

    भुसावळचे डॉ. तुषार पाटील यांचे प्रिक्वॉलिफाईड रन स्पर्धेत यश

    By June 16, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ – लद्दाख येथे होणार्‍या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुण्यात प्रिक्वॉलिफाईङ रन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भुसावळच्या डॉ. तुषार पाटील यांनी रात्रीच्या काळोखाला छेदत 74 किलोमीटरचे अंतर व 1138 मीटरची उंची 10 तास 49 मिनिटात पूर्ण केले.

    लद्दाख येथे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दरवर्षी अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली जाते. त्यासाठी 55 किलोमीटर, 111 किलोमीटर, 222 किलोमीटर, 333 किलोमीटर, 444 किलोमीटर व 555 किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटात देश-विदेशातील सर्वोत्तम धावपटू सहभाग नोंदवत असतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रिक्वॉलिफाईड रन आयोजित केले जातात. अशा प्रकारचा रन पुणे येथील गोठावडे फाटा ते लवासा सिटी व तेथून पुन्हा त्याच मार्गे परत असा तब्बल 74 किलोमीटरचा रन आयोजित केला होता.

    विशेष म्हणजे 1138 मीटर उंचीचे शिखर गाठायचे होते. शनिवारी रात्री ठीक दहा वाजता भुसावळचे डॉ. तुषार पाटील, मुंबईचे सतीश गुजरण व तरुण शर्मा, पुण्याचे मंगेश शिंदे, विशाल, हरी या सहा धावपटूंनी धावायला सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सतत अकरा तास धावून 74 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यामध्ये डॉ. तुषार पाटील व सतीश गुजरण यशस्वी झाले. भुसावळच्या डॉ. पाटील यांनी हे अंतर 10 तास 49 मिनिटात पूर्ण केले. डॉ. तुषार यांचे प्रवीण फालक, डॉ. निलिमा नेहेते, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील, संतोष गवळे, विकास पाटील व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif