भुसावळकरांनी जल्लोषात धूलिवंदनाचा लूटला आनंद

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- राग, लोभ, मोह , मत्सर ,तिरस्कार अश्या दुर्गुणांची होळी करून दुसऱ्या दिवशी प्रेम, आनंद ,उत्साह, व समानतेचा संदेश देत विविध रंगांची उधळन करीत भुसावळकरांनी होलीकोत्सव व रंगोत्सवाचा आनंद जल्लोषात लूटला. यंदा सर्वत्र ‘कोरोना’ व्हायरस या रोगाचे सावट असल्याने अनेकांनी घरात राहण्यास अधिक पसंती दिली. कोरोनाचे भितीमुळे उत्साहावर विरजण पडल्याचे दिसून आले.

तर अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसचे होळीत दहन करून शहरात अबालवृद्ध यांनी पाण्याची नासाडी होऊ न देता कोरडया व नैसर्गिक रंगाना प्राधान्य देवून मनसोक्त आनंद घेतला. महिलां व तरुणी यांनी सुद्धा मनमुराद रंगांची उधळन करीत उत्साहात धुळवड साजरी केली. तर अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाईने बेधुंद होऊन नाचत होळी साजरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.