भुयारी गटार योजनेच्या कामामुळे जलवाहिन्यांचे नुकसान

0

अमळनेर(प्रतिनिधी) : शहरातील विविध भागात प्रगती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे नुकसान मागील काही दिवसांपासून नियमित सुरू आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे, तसेच नियमित पाणीपुरवठा देखील विस्कळित होत आहे.

नगरपरिषदेच्या वतीने शुद्धीकरण करून शहरात पुरविण्यात येणारे लाखो लिटर पाणी वाया जाते व त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या हक्काच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊन नागरिकांमध्ये नगरपरिषदे विषयी गैरसमज निर्माण होत आहे,तरी नगरपरिषदेने संबंधित ठेकेदाराकडून वाया घालवलेल्या पाण्याचा कर रुपी मोबदला वसूल करावा अशी मागणी नगरसेवक शाम पाटील यांनी नगरपरिषदेच्या मुख्यअधिकारी यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.