Wednesday, September 28, 2022

भीषण अपघात; एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी

- Advertisement -

साकेगाव, ता.भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

साकेगाव येथून महामार्गावरून जाणाऱ्या राष्ट्रीय उड्डाणपुलाच्या जवळ ट्रॉला, कोंबड्या वाहून नेणारी पीकअप व्हॅन आणि दुचाकीचा अपघात होवून एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

साकेगाव येथील उड्डाणपुलाच्या उतारावर रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास ट्रॉला आणि कोंबड्या वाहून नेणाऱ्या व्हॅनची टक्कर झाली. यात एमएच -१९ पीजी ०२२४ या क्रमांकाच्या दुचाकीलाही या दोन्ही वाहनांनी उडविले. या अपघातात मोटारसायकल चक्काचूर झाली असून ट्रॉला आणि पीक अप व्हॅनचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून व्हॅनमधील एक आणि ट्रॉलातील एक असे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना डॉ . उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक शेंडे, शहर स्थानकाचे निरिक्षक प्रतापराव इंगळे, एएसआय राठोड, हेड कॉन्स्टेबल काझी व हेड कॉन्स्टेबल भोई यांच्यासह बाजारपेठ पोलीस कर्मचारी आणि नशिराबाद टोलनाका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मयताचे पार्थिव शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. संबंधीत मृत तरुणाची ओळख पटली असून तो भुसावळातील रहिवासी असून रात्री जळगाव येथून काम करून घरी येत असतांना अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

ट्रॉला आणि पीकअप व्हॅनचे ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मृत तरुण हा मुकेश रामकुमार परदेशी (रा. श्रध्दा कॉलनी, जामनेर, भुसावळ ) असून तो जळगावातील एका वर्तमानपत्रात कार्यरत होता. रात्री उशीरा काम आटोपून घरी परत येत असतांना झालेल्या अपघातात त्याने प्राण गमावले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या