Thursday, September 29, 2022

भीषण अपघातात 2 ठार, 4 जखमी; 6 महिन्यांचे बाळ सुखरूप

- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जामनेरमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. जामनेर पाचोरा रस्त्याकड रोडवर नागदेवता मंदिराजवळ जामनेर शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने इंडिगो क्र. एम. एच. 18 डब्ल्यू 2412 कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

- Advertisement -

- Advertisement -

या अपघातात इंडिगो कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात आणखी ३ जण अत्यवस्थ असून सहा महिन्याचे बाळ मात्र अपघातातून वाचले आहे. पुन्हा देव तारी त्याला कोण याची प्रचिती पहावयास मिळाली आहे.

झालेल्या अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (वय २५, रा. तुकाराम नगर), सुजाता प्रवीण हिवरे (वय ३०, रा. त्रिमूर्तीनगर दोघे रा. भुसावळ) हे ठार झाले आहेत. तर हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे, लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत.

स्पंदन याचे वडील पंकज यांचा अपघातात मृत्यू झाल्याने तो पितृप्रेमाला हिरावला होऊन आता पोरका झाला आहे. तर त्याची आई हर्षा सैंदाणे ह्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अपघातात जखमी झालेल्या जखमींना तातडीने मदत करीत माणुसकी धर्म जोपासला. पुढील उपचारासाठी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या