भीमा-कोरेगाव प्रकरणी शरद पवारांना समन्स

0

पुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना चौकशी आयोगाने समन्स बजावले आहेत. त्यांना चार एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.


शरद पवार यांनी १८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यात पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच, मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर एक वेगळे वातावरण तयार केले होते. त्याचा परिणाम म्हणून ही हिंसा झाली, असा गंभीर आरोपही पवार यांनी केला होता.

यावरून अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी भीमा-कोरेगाव शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगाने शरद पवारांना चौकशीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांना ४ एप्रिलपर्यंत आयोगाने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.