ठाणे : ठाण्यातील भिवंडीमध्ये पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी 20 जणांना सुखरूप ढिगाऱ्याबाहेर काढले आहे.
#UPDATE Five people have lost their lives in the Bhiwandi building collapse incident: Thane Municipal Corporation PRO #Maharashtra https://t.co/jrpBvvtoCI pic.twitter.com/yRpkUiFZZd
— ANI (@ANI) September 21, 2020
भिवंडीतील पटेल कंपाऊंडमध्ये दुर्घटना घडली. NDRF ची टीम, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. दरम्यान एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.