भिलाली येथे गावठी हातभट्टी उद्धवस्त ; पारोळा पोलिसांची कामगिरी

0

पारोळा (प्रतिनिधी) :  तालुक्यातील भिलाली येथिल बोरी नदीच्या पात्रात काठाजवळ झाडाच्या आडोशाला बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त करीत  ३२ हजाराच्या मुद्देमाल नष्ट केला आहे.

पारोळा तालुक्यातील भिलाली येथील बोरी नदीच्या काठाजवळ झाडाच्या आडोशाला अशोक शंकर पवार हा इसम बेकायदेशीर पणे गावठी दारूची हातभट्टी चालवत असल्याची गुप्त  माहिती पारोळा पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना मिळाली.

गुप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी ४ वाजता पोलिसांनी भिलाली येथे पोलीस निरीक्षकांचे पथक पो.हे.का.नाना पवार,महेश पाटील,मोहसीन खान,शशिकांत निकम अश्यानी जावुन धाड टाकली.

धाडीत ३२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जागीच नष्ट केला असून आरोपी मात्र पोलिसांची चाहूल लागताच फरार होण्यात यशस्वी झाला.

याबाबत पोलिसात पो, काॅं,  शशिकांत सोपान  निकम यांच्या  फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक  तपास पो.हे.काॅं नाना पवार हे करित आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.