भिमज्योत मित्रमंडळातर्फे 45 गरजूना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

0

जळगाव : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बांभोरी येथील भिम ज्योत मित्र मंडळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायींतर्फे भोकणी येथील गरीब व गरजू ४५ कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे संपूर्ण किटचे घरपोच वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता यावर्षी जयंती उत्सव खर्चातून समाजोपयोगी उपक्रम राबवून भीमरायांना अभिवादन करण्यात आले.
लॉकडॉऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा रोजगार बुडल्याने त्यांचे कुटुंबियांना मोठ्या आर्थिक विवंचनेला सामोरे जात आहे. त्यामुळे यावर्षी जयंतीच्या खर्चातून भोकणी येथील ४५ गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे संपूर्ण किटचे घरपोहच वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी भिम ज्योत मित्र मंडळाचे अतुल बनसोडे, पवन अहिरे, शुभम तायडे, विशाल सोनवणे, सचिन बिऱ्हाडे, विजय मोरे, अजय मोरे, ऋषी गायकवाड, पंकज बागुल, मनोज गायकवाड, महेंद्र तायडे, हर्षल तायडे, अक्षय सपकाळे, रितेश सोनवणे, राहुल बनसोडे, दीपक बनसोडे, सतीश बिऱ्हाडे, सागर अहिरे, अंकुश भालेराव, मनोज अहिरे, प्रदीप साळुंके, भैय्या साळवे, भोकणी येथील माजी सैनिक वाघ आदींनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.